Type Here to Get Search Results !

कोमल ढेरंगे यांच्या पाठपुराव्याला यश; कोरेगाव भीमाच्या विकासकामांना १९.९० लाखांचा निधी मंजूर



कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

कोरेगाव भीमा परिसरातील विविध विकासकामांसाठी १५ व्या वित्त आयोगातून तब्बल १९ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती शिरूर पंचायत समितीच्या सदस्या कोमल सत्यनारायण ढेरंगे यांनी दिली. यासाठी सभापती स्वाती घावटे आणि उपसभापती रामभाऊ सासवडे यांच्या सहकार्याने या विकासकामांचा पाठपुरावा करण्यात आला.

मंजूर झालेल्या कामांमध्ये कोरेगाव भीमा येथील म्हसोबा नगर व गणेश नगर येथे नवीन पाईपलाइन टाकणे यासाठी ९ लाख ९० हजार रुपये तसेच वाघेश्वर नगर येथील गटार दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये, तर कोरेगाव भीमा येथील पाणीपुरवठा विहीर व पंप हाऊस दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठा व स्वच्छतेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होणार असून, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. मंजूर झालेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठा व स्वच्छतेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होणार असून, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. मंजूर झालेली कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

“ या निधीतून कोरेगाव भिमा येथील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांची दैनंदिन गैरसोय कमी होणार आहे .

- कोमल ढेरंगे (पंचायत समिती सदस्या शिरुर)

Post a Comment

0 Comments