Type Here to Get Search Results !

नवरात्री निमित्ताने कोरेगांव भिमात दुर्गादौड चे आयोजन

 


कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व कोरेगांव भिमा ग्रामस्थांच्या माध्यमातुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गादौड चे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिल्या दिवसाचा शुभारंभ आदर्श प्रतिष्ठान चे गणपती ची आरती करून करण्यात येणार आहे. 

पहिल्या दिवशीच्या दुर्गादौड निमित्ताने आरती चा मान आदर्श चौकातील गणपती मंदिराला मिळाला. तसेच सकाळी धर्मवीर चौक, गव्हाणे तालीम, अचानक चौक, अष्टविनायक चौक, आदर्श चौक, दोस्ती चौक असा पहिला दिवशीचा मार्ग असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.



दुर्गादौड चे मार्गावरील प्रत्येक चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, देशभक्ती पर गीते, देवीची गीते गाण्यात येतात. सर्वांनी डोक्यावर गांधी टोपी घालत नागरिकांनी या दुर्गदौडेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

आदर्श चौकात आरती असल्याने आदर्श प्रतिष्ठान च्या स्वयसेवकांनी चौकात फुलांच्या पायघड्या, तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments