Type Here to Get Search Results !

अचानक मित्र मंडळाचे देवीची शारदीय नवरात्र निमित्ताने प्राणप्रतिष्ठापना



कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील लिंब चौकातील अचानक मित्र मंडळाच्या दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. यावेळी पौरोहित्य शैलेश कुलकर्णी यांनी केले.

यावेळी मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे हस्ते सपत्निक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला तसेच लहान मुले आणि पदाधिकारी उपस्थित होते.

१९८० साली अचानक मित्रमंडळाचे माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव तसेच नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो.

मंडळाचे वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर साजरे करण्यात येतात. तसेच नवरात्री चे निमित्ताने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने देवीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे यावेळी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments