Type Here to Get Search Results !

लोणीकंद पोलीस स्टेशनच्या विघ्नहर्ता न्यास कमिटी गणराया अवार्डचे वितरण



तुळापूर,शिवले वस्तीतील जय हनुमान तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचा गणराया अवार्ड

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

                     हवेली तालुक्यात पुणे शहर अंतर्गत लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने 'विघ्नहर्ता न्यास कमिटी' यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणराया अवार्ड' स्पर्धेतील सर्वेक्षण परीक्षणाच्या माध्यमातून लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एकूण १६७ गणेशोत्सव मंडळांपैकी उत्कृष्ट सजावट, शिस्तबद्ध काटेकोर नियोजन आणि समाज प्रबोधन, समाजपयोगी उपक्रमाचे निकषाच्या माध्यमातून परीक्षण सर्वेक्षण पाहणी करून 'गणराया अवार्ड' ही स्पर्धा घेण्यात आली होती.

                या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लोणीकंद पोलीस स्टेशन येथे सभागृहात पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर, ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे, पोलीस गोपनीय विभागाचे प्रमुख रितेश काळे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी विघ्नहर्ता न्यास कमिटीचे उत्तमराव भोंडवे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरंगे, पोलीस हवलदार ठानगे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पच्छिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव लोखंडे आदी गावचे पोलीस पाटील, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

                 यामध्ये श्री क्षेत्र तुळापूर येथील शिवले वस्तीतील "जय हनुमान तरुण मंडळाचा प्रथम क्रमांकाचा 'गणराया अवार्ड'चा मानकरी ठरला. तर द्वितीय क्रमांक डोंगरगाव माळवाडी येथील आदर्श तरुण मंडळ, तृतीय क्रमांक वढू खुर्द येथील बागवान वस्तीतील शिवगणेश तरुण मंडळ ठरले. तर उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथील वाडेगाव गावठाणातील श्री गणेश युवा प्रतिष्ठान, लोणीकंद येथील बालदेव युवा प्रतिष्ठान, न्हावी सांडस मधील स्वामी समर्थ मित्र मंडळ, पेरणे फाटा येथील जगदंब प्रतिष्ठान, बिवरी येथील एकता मित्र मंडळ ठरले आहे.

Post a Comment

0 Comments