Type Here to Get Search Results !

धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान चे माध्यमातून शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन



कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

कोरेगाव भिमा, ता. शिरुर येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान चे माध्यमातून यंदा ही शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच माजी सरपंच विजय किसनराव गव्हाणे तसेच प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत शहाजी गव्हाणे यांनी दिली .



देवीची प्रतिष्ठापना कोरगाव भीमा ग्रामपंचायतचे माजी सदस्य उमेश नरहरी गव्हाणे पाटील तसेच त्यांच्या पत्नी शिरूर तालुका भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस भारती उमेश गव्हाणे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मागील तेरा वर्षांपासून गव्हाणे पाटील परिवाराच्या वतीने देवीची मूर्ती नवरात्र उत्सवासाठी देण्यात येते.


यावेळी कोरेगाव भीमा येथील अनेक पदाधिकारी तसेच दुर्गामाता भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ९ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आज दिनांक १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता "तुम्ही म्हणाल तसं" हा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम. १५ ऑक्टोबर सोहळा संख्यांचा खेळ पैठणीचा. शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर रात्री नऊ वाजता देऊळ बंद मराठी चित्रपट. रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता बारा गावच्या बारा अप्सरा हा लावण्यांचा कार्यक्रम तसेच सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


शारदीय नवरात्र उत्सवासाठी शिरुर पंचायत समितीचे माजी सदस्य पि के आण्णा गव्हाणे पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बबनराव गव्हाणे पाटील, विक्रमराव दौंडकर यांचे मार्गदर्शन तसेच प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष रमेश गव्हाणे, गणेश राऊत, कार्याध्यक्ष यश मधुकर गव्हाणे यांचेसह उत्सवाचे व्यवस्थापक सुनील पंढरीनाथ गव्हाणे सह आदी पदाधिकारी करत आहेत.

तरी कोरेगाव भिमा आणि पंचक्रोशीतील तमाम दुर्गामाता भक्तांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धर्मवीर प्रतिष्ठान चे माध्यमातून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments