Type Here to Get Search Results !

हवेली तालुका शिवसेना आढावा बैठक उत्साहात संपन्न



हवेली तालुक्यात विकासाची गंगा आणणार; प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम ताकद उभी करणार : मंगेश चिवटे

पुणे : गजानन गव्हाणे पाटील 

हवेली तालुका शिवसेनेची विशेष आढावा बैठक अत्यंत उत्साही व भारलेल्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी (OSD) मंगेश चिवटे यांचे प्रमुख मार्गदर्शन केले.



या वेळी मार्गदर्शन करताना मंगेश चिवटे म्हणाले की, "हवेली तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जातील. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेनेचा कणा असून तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला संपूर्ण ताकद दिली जाईल. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे."

या बैठकीचे यशस्वी आयोजन तालुका प्रमुख विपुल शितोळे, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश सातव आणि शिवसेना जिल्हा समन्वयक गणेश मस्के यांनी केले.

या आढावा बैठकीस युवासेना संपर्क प्रमुख अनिकेत जावळकर, जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख तृप्ती सरोदे , जिल्हा सघटक निलेश काळभोर, जिल्हा नियोज समिती सदस्य अलंकार कांचन, उपजिल्हा प्रमुख शामराव माने, युवासेना तालुका प्रमुख विक्रम वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.

यांच्यासह हवेली तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक गणेश मस्के यांनी केले, तर उपस्थितांचे आभार युवासेना जिल्हा प्रमुख गणेश सातव-पाटील यांनी मानले. 


Post a Comment

0 Comments