Type Here to Get Search Results !

सत्यमेव जयते आणि स्वराज्य महिला बचत गटाच्या विद्यमाने महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठण कार्यक्रम



कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

दुर्गा माता की जय..... जय मातादी च्या जयघोषात याही वर्षी सत्यमेव जयते आणि स्वराज्य महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव भिमा येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवानिमित्त महाआरती आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.



मागील चार वर्षांपासून या ठिकाणी महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठण करण्यात येते यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. श्रीनिवास कर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बचत गटाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य वंदना गव्हाणे व सचिव कांचन गव्हाणे,  दमयंती कांचन यांनी नियोजन केले होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी समीक्षा अरविंद गोकुळे यांचे आणि इतर महिलांचे हस्ते देवीची आरती संपन्न झाली.

सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये गणपती स्तोत्र तसेच शारदीय नवरात्र उत्सवाचे निमित्ताने महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठण चे आयोजन करण्यात येते. तसेच या उपक्रमांत महिलांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत असल्याचे कोरेगाव भिमा ग्रामपंचायत च्या सदस्या वंदना विजय गव्हाणे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments