Type Here to Get Search Results !

गांधी जयंती निमित्ताने एनटिटीएफ महाविद्यालय आणि ग्रामपंचायत चे वतीने स्वच्छता अभियान



कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील NTTF College and IndoSwiss Center of Excellence या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोरेगाव भिमा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने कोरेगाव भिमा सस्मशानभूमी परिसर स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमात महाविद्यातील तब्बल १०० विद्यार्थी सक्रियपणे सहभागी झाले होते.

या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत स्मशानभूमी परिसरातील प्लास्टिक कचरा तसेच इतर ठिकाणची हातात झाडू, खराटे घेऊन स्वच्छता करण्यात आली. तसेच भविष्यात आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि इतरांना देखील स्वच्छता करण्यासाठी परावृत्त करण्याची शपथ घेण्यात आली.

यावेळी विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे, पोलिस पाटील मालन गव्हाणे पाटील , आयटीसी कंपनीचे संदीप भोरे, एनटिटीएफ महाविद्यालयाचे युनिट हेड निधीन एस. एस., पंकज खंबायत, योगेश पवार, प्रवीण मांढरे, सुरेंद्र भांडवलकर आदी प्रमुख तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

आयटीसी कंपनीचे संदीप भोरे यांनी यावेळी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल आणि प्लास्टिक कचऱ्याचे बद्दल जनजागृती केली. तसेच या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीच्या १२ कर्मचाऱ्यांना स्वच्छता किट भेट म्हणून देण्यात आले.

Post a Comment

0 Comments