Type Here to Get Search Results !

श्री वाघेश्वर डेअरी फूड्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्सचा दशकपूर्तीचा गौरवशाली प्रवास!



शुद्धता, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर दुग्ध व्यवसायात निर्माण केली वेगळी ओळख

बारामती प्रतिनिधी : शंकर भिसे

 पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर डेअरी फूड्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध उत्पादन संस्थेने आपल्या यशस्वी वाटचालीची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. शुद्धता, गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहकांचे समाधान या मूल्यांच्या आधारावर संस्थेने दुग्ध व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्याबरोबरच ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेची वाटचाल सुरू झाली. आज 'मालती दूध' या नावाने संस्थेची विविध उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.

दर्जेदार उत्पादनांमुळे ग्राहकांच्या विश्वासाला बळ

श्री वाघेश्वर डेअरी फूड्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गायीचे दूध, म्हशीचे दूध, दही, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, ताक, पनीर, तूप, आइस्क्रीम यांसह विविध दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि विविध चवींची पेयेही संस्थेच्या उत्पादनांमध्ये समाविष्ट आहेत.

उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवणे, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि बदलत्या बाजारपेठेनुसार उत्पादनांमध्ये विविधता आणणे यावर संस्थेचा भर राहिला आहे.

ग्रामीण भागातून उद्योगविश्वात यशस्वी वाटचाल

मांडवगण फराटा या ग्रामीण भागातून सुरू झालेला संस्थेचा प्रवास हा जिद्द, मेहनत आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचे उदाहरण ठरत आहे. ग्रामीण भागात उद्योग उभारून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने अशा उद्योगांचे महत्त्व मोठे आहे.

Post a Comment

0 Comments