बारामती प्रतिनिधी : शंकर भिसे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासा विषयी आवड निर्माण व्हावी आणि बालकलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्रदादा पवार किल्ले बनवा स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत बारामती तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून शिवकालीन इतिहासाला उजाळा द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ११ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ १ हजार रुपयांची एकूण ११ बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची ओळख होण्यास मदत होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या किल्ल्याची माहिती देणारा व्हिडिओ ९६५७३५३८३८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच बालकलाकारांच्या कल्पकतेला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments