जिल्हा परिषद शाळा काटेवाडीचे मुख्याध्यापक जोरी सर यांच्या कन्येच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव!
बारामती प्रतिनिधी : शंकर भिसे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडीचे मुख्याध्यापक जोरी सर यांच्या कन्या मृणाल जोरी यांनी बी.ए.एम.एस. (BAMS) पदवी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन आपल्या शैक्षणिक वाटचालीत यशाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मृणाल जोरी यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जोरी कुटुंबीयांच्या आनंदात भर पडली असून काटेवाडी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आई-वडिलांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि स्वतःच्या मेहनतीच्या बळावर मृणाल यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
मृणाल जोरी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी वैद्यकीय वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्यासह भरभरून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Post a Comment
0 Comments