वाडेबोल्हाई : गजानन गव्हाणे पाटील
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा नियोजन व्हावे, या उद्देशाने पशुवैद्यकीय चिकित्सालय, वाडेबोल्हाई येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा लाभ केसनंद, कोलवडी व वाडेबोल्हाई येथील बहुसंख्य शेतकरी व पशुपालकांना झाला. यामध्ये Dharati Seeds व Advanta 756 या वाणांच्या मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे-पाटील, कुबेर पतसंस्थेचे चेअरमन रमेश बाप्पू हरगुडे, सरपंच पल्लवी प्रदीप शिंदे, माजी उपसरपंच योगेश गायकवाड, फोर स्क्वेअर डेव्हलपर्सचे प्रदीप शिंदे, कर्मचारी शंकर पाटोळे व पशुधन पर्यवेक्षक अविनाश गवारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सुरेखाताई हरगुडे-पाटील यांनी सांगितले. पशुधन पर्यवेक्षक अविनाश गवारी यांनी शेतकरी व पशुपालकांनी जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा तसेच नियमित लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments