कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील शिवतेज प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदाही आकर्षक गणेशमूर्तीची गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठानचे हे २१ वे वर्ष असून आपली पारंपरिक परंपरा या ही वर्षी मंडळाने जोपासली आहे.
मंडळाचे वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समाजाच्या हिताचे उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये मुख्यतः वृक्ष रोपण, होम मिनिस्टर, लहान मुलांचे खेळ, दही हंडी, दुर्गा दौड, अनाथलय तसेच पूरग्रस्थांसाठी मदत आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. अशी माहिती प्रतिष्ठान चे संस्थापक संग्राम बाळासाहेब ढेरंगे यांनी दिली.
तसेच या ही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमित लक्ष्मण ढेरंगे व उपाध्यक्ष सूरज सुदाम चव्हाण यांनी सांगितले. या वर्षी प्रतिष्ठानचे माध्यमातून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून ॐ काळेश्वरी ढोल ताश्या पथकाचे वतीने वादन करण्यात आले असल्याचे प्रतिष्ठान चे खजिनदार- अजित लक्ष्मण ढेरंगे, कार्याध्यक्ष सार्थक लभाणे
सचिव जयेश ढेरंगे यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments