कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
जय शिवराय प्रतिष्ठान संचालित धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय, तुळापूर (चित्रकला केंद्र क्रमांक: १०७०९७) येथे शासकीय एलिमेंट्री ग्रेड परीक्षा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरु झाली . या परीक्षेसाठी परिसरातील विविध शाळांमधून एकूण २३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी केंद्रावर एकूण १० ब्लॉकची (बैठक व्यवस्था) नियोजनबद्ध रचना करण्यात आली आहे .
यामध्ये धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय तुळापूर या मुख्य केंद्रा सोबतच नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ, पवनसुत इंग्रजी माध्यमिक विद्यालय मरकळ, मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, सोळू, खेड आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे, खेड या विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री ग्रेड परीक्षेला हजेरी लावली.
परीक्षेच्या पूर्वसंध्येला व परीक्षा सुरू असताना संस्थेचे अध्यक्ष अविनाश बलकवडे आणि संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक आबा जाधव यांनी सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना उत्तम यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
परीक्षा अतिशय पारदर्शक आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी तुळापूर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांचा कलात्मक प्रतिसाद व शिक्षकांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे ही परीक्षा सुरळीत सुरु आहे .

Post a Comment
0 Comments