कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील छत्रपती संभाजी हायस्कूल मध्ये रात्री झालेल्या पावसामुळे शाळेच्या परिसरात डबक्याचे स्वरूप आले असून नियोजन शून्य व्यवस्थेमुळे या डबक्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाण्याची वेळ आली.
वास्तविक या शाळेमध्ये प्रत्येक वेळी मोठा पाऊस झाल्या नंतर ग्राउंड तसेच गेट जवळ तसेच स्वच्छता गृहाच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते. त्यामुळे अश्या अवस्थेतून या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी यावे लागत आहे.
विद्यालयात विविध उपक्रम साजरे करण्यात येतात खरे मात्र पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने पालकांनी तसेच माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाचे पाणी अनेक दिवस आहे तसेच साचून राहत असल्याने अनेक विद्यार्थी घसरून पडण्याची शक्यता आहे. तरी या विद्यालयातील व्यवस्थापन समितीने आणि विद्यालयाच्या प्रशासनाने पावसाळ्यात शाळेच्या आवारात पाणी साचू नये या साठी भविष्यात ठोस उपाय योजना करावी अशी मागणी माजी विद्यार्थ्यांचे कडून करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments