Type Here to Get Search Results !

शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक येथे एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्साहात; ३४९ विद्यार्थ्यांचा सहभाग

 


कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

वढू बु ll, ता.शिरूर येथील श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात (चित्रकला केंद्र क्रमांक: १०७१५१) येथे शासकीय एलिमेंट्री आणि इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरु झाली .या परीक्षेसाठी परिसरातील विविध शाळांमधून एकूण ३४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी केंद्रावर एकूण १० ब्लॉकची (बैठक व्यवस्था) नियोजनबद्ध रचना करण्यात आली आहे.

यामध्ये शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक, छत्रपती संभाजी हायस्कुल कोरेगाव भिमा, ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भिमा, सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भिमा, फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भिमा, महाराजा सयाजीराव गायकवाड माध्यमिक विद्यालय पिंपळे जगताप या विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट  ग्रेड परीक्षेला हजेरी लावली.



परीक्षा अतिशय पारदर्शक आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी वढू बु ll विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले आणि नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांचा कलात्मक प्रतिसाद व शिक्षकांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे ही परीक्षा सुरळीत सुरु आहे.

परीक्षेला विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख एकनाथ चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. सदर परीक्षेला केंद्रप्रमुख म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ शंकरराव चव्हाण, विद्यालयाचे कलाशिक्षक काळु सूर्यवंशी आणि मदतनीस हरिष शिंदे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments