Type Here to Get Search Results !

काटेवाडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०८ नागरिकांनी घेतला लाभ



अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर बारामती यांचा स्तुत्य उपक्रम; मोफत आरोग्य तपासणीसह औषधांचे वाटप!

बारामती प्रतिनिधी : शंकर भिसे

 ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा, या सामाजिक उद्देशाने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर बारामती यांच्या वतीने काटेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण १०८ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचालाभ घेतला.



काटेवाडी येथील शिवाजीनगर परिसरात शंकर भिसे यांच्या निवासस्थानी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.

या शिबिरात ६८ महिला व ६० पुरुषांची उपस्थिती नोंदविण्यात आली असून, त्यापैकी १०८ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये २० नागरिकांची रक्तातील साखरेची तपासणी, तर १०५ नागरिकांची रक्तदाब करण्यात आली. याशिवाय प्राथमिक आरोग्य तपासणी करून नागरिकांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, पित्त, पोटदुखी यांसारख्या सामान्य आजारांवर वैद्यकीय सल्ल्यानुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या उपक्रमाचा लाभ झाला.



या आरोग्य शिबिरासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे डॉ. राहुल सरोदे व रुग्णवाहिका चालक तथा सहकारी दत्तात्रय कडणे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आशा सेविका संध्या काळे, सारिका खोमणे, अनिता राऊत, सुषमा लोंढे तसेच आरोग्य अधिकारी अलगुडे यांचे मोलाचे सहकार्य आधकारी अलगुडे यांचे मोलाचे सहकाय लाभले. या सर्वांनी नागरिकांपर्यंत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

ग्रामीण भागात अनेक नागरिक दैनंदिन कामाच्या व्यापामुळे नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत गावातच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरला.

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर बारामती यांच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारची मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

या शिबिरासाठी परिश्रम घेतलेल्या डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि सहकार्याचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानन्यात आले.

तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे बारामती तालुका उपाध्यक्ष अमीर मुलाणी, तुकाराम काटे, अविनाश भिसे, पत्रकार शंकर भिसे, किरण भिसे,हनुमंत पाटोळे, दीपक भिसे, निलेश जाधव, अजित भिसे,अतुल देवकर, अक्षय खुडे, संदीप दळवी, तन्मय भिसे सार्थक गोसावी, जय चव्हाण, विजय भिसे अथर्व जाधव,अनिल पाटोळे हे सर्वजन उपस्थित राहिले.

Post a Comment

0 Comments