कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १९ ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि मालमत्ता असलेल्या या संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी तालुक्यातील राजकीय गटांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे-नगर रोड, वाघोली येथील पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा वाघोलीचे माजी उपसरपंच ज्येष्ठ नेते संजय (आप्पा) सातव पाटील यांनी त्यांच्या इतरत्र सहकारी उमेदवारांसह आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
सहकारातील वर्चस्वासाठी चुरस यापूर्वी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,यशवंत सहकारी साखर कारखाना आणि पुणे बाजार समितीतील राजकीय समीकरणे मजबूत करण्याचे प्रयत्न झाल्याचे मानले जाते.मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या निवडणुकीत नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत कोणते गट एकत्र येणार,कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणत्या नेत्याची राजकीय ताकद पणाला लागणार,याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
१९ जागांसाठी ३०३ मतदार हवेली तालुका सहकार निबंधक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीच्या माहितीनुसार, तालुका कृषी पणन संस्थांचे ९३, तर प्रतिनिधी सभासदांचे २१० मतदार आहेत. अशा एकूण ३०३ मतदारांना संघाच्या १९ जागांसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांची संख्या मर्यादित असली,तरी प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना मतदारांशी संपर्क वाढवावा लागणार आहे.
निवडणूक कार्यक्रम -
जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी रंगीत तालीम ?निवडणुकीचे वेळापत्रक १९ ते २६ ऑक्टोबर २०२६ उमेदवारी अर्ज दाखल करणे,२७ ऑक्टोबर अर्जाची छाननी,१२ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत,२१ नोव्हेंबर मतदान

Post a Comment
0 Comments