बारामती प्रतिनिधी. शंकर भिसे
काटेवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा देवाच्या मंदिरात स्वखर्चातून आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिर परिसराचे सौंदर्य वाढविणारे उद्योजक सुजित नरुटे यांचा सचिन मासाळ व बिरोबा मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उद्योजक सुजित नरुटे यांनी सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक श्रद्धा जपत बिरोबा मंदिरात विद्युत रोषणाईची व्यवस्था केली. त्यामुळे मंदिर परिसर आकर्षक व प्रकाशमय झाला असून भाविक आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत सचिन मासाळ आणि बिरोबा मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी सुजित नरुटे यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. गावातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी अशा प्रकारे स्वखर्चातून पुढाकार घेणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची भावना मनात असेल, तर विधायक कार्यातून गावाच्या विकासात हातभार लावता येतो, याचे उत्तम उदाहरण उद्योजक सुजित नरुटे यांनी घालून दिले आहे.
यावेळी सचिन मासाळ व मंदिर पदाधिकाऱ्यांनी सुजित नरुटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या हातून भविष्यातही अशीच धार्मिक, सामाजिक व समाजोपयोगी कामे घडत राहावीत, अशा शुभेच्छा दिल्या.
बिरोबा देवाच्या मंदिरासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे उद्योजक सुजित नरुटे यांचे काटेवाडी परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments