Type Here to Get Search Results !

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न



२०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना प्रथम ‘स्वराज्य आरोग्यभूषण पुरस्कार २०२६’

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा २०२६–२०२८ या कालावधीसाठीचा पदग्रहण सोहळा श्रेयस बँक्वेट हॉल, केसनंद फाटा, वाघोली येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सुमारे २०० डॉक्टर उपस्थित होते. यावेळी रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष व्यवस्थापकीय विश्वस्त व मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांना प्रथम ‘स्वराज्य आरोग्यभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. सायमन ग्रँट यांचाही सन्मान तसेच सहयोगी असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला 

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बाबासाहेब काशिद यांनी सांगितले की, स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशन सर्व डॉक्टरांसाठी खुले व्यासपीठ असून, वर्षभर सदस्य नोंदणी सुरू असते. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय आरोग्य तपासणी, शैक्षणिक साहित्य वाटप, CME, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया, कौटुंबिक स्नेहमेळावे, सहली आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून असोसिएशन सामाजिक बांधिलकी जपत आहे.

नवनियुक्त कार्यकारिणी :-

कोअर कमिटी : अध्यक्ष – डॉ. मच्छिंद्र बाबासाहेब काशिद; उपाध्यक्ष – डॉ. भरत शितोळे, डॉ. ज्ञानेश्वर खरात,डॉ. सतीश मेहरे; सचिव – डॉ. नितीन पवार; सहसचिव – डॉ. श्रीनिवास मैंदाड; खजिनदार – डॉ. अजय गिरी; सहखजिनदार – डॉ. मनोज ठाकरे.

महिला मंच : डॉ. पल्लवी मेहरे, डॉ. स्मिता शिंदे, डॉ. स्नेहा काशिद, डॉ. रश्मी खरात.

सामाजिक व सांस्कृतिक समिती : डॉ. अश्विनी पवार, डॉ. प्रिया मैंदाड, डॉ. रवींद्र साळवे, डॉ. दिपा हिंगणेकर.

मेडिको-लीगल व ॲडव्हायझरी समिती : डॉ. हेमंत विभूते, डॉ. स्वप्नील मरकड, डॉ. चंद्रशेखर दरेकर, डॉ. प्रशांत पाटोळे.

क्रीडा समिती : डॉ. संतोष खरात, डॉ. अक्षय ठाकरे, डॉ. रुचिका सिंगल, डॉ. सायली भुजबळ.

CME समिती : डॉ. प्रदीप बोडके, डॉ. कपिल जुमले, डॉ. ज्योती जाधव, डॉ. साक्षी साळवे.

सोशल मीडिया समिती : डॉ. सौरभ जाधव, डॉ. प्रसाद कुमावत, डॉ. रश्मी चव्हाण, डॉ. मधुबाला शितोळे.

युवा समिती : डॉ. शुभम शिवले, डॉ. अश्विनी शेळके, डॉ. वैष्णवी चांदकर, डॉ. सुरभी कदम.

क्विक रिस्पॉन्स कमिटी (QRC) : डॉ. शरद जुमले, डॉ. शिरीष भुजबळ, डॉ. विद्या कुमावत, डॉ. लक्ष्मी सोमाणी 

निमंत्रित सदस्य : डॉ. संदीप कर्चे 

“सेवा, समर्पण आणि संघटन या त्रिसूत्रीवर आधारित असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे,” असे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र काशिद यांनी सांगितले.

 कार्यक्रमाल पोलीस बांधव तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments