माजी उपसरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय सोपान कंद यांच्या उमेदवारीकडे ग्रामस्थांचे लक्ष
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, लोकनियुक्त सरपंच पदासाठी माजी उपसरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय सोपान कंद यांच्या नावाची गावातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. गावातील विविध प्रश्नांची जाण, विकास कामांचा अनुभव आणि नागरिकांशी असलेला संपर्क यामुळे संजय कंद हे सरपंचपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे.
संजय सोपान कंद हे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत. यापूर्वी उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी गावातील अनेक कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गावाच्या विकासासाठी अनुभवी, प्रभावी आणि प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, पथदिवे आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व मिळावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय कंद यांचे नाव सरपंचपदासाठी चर्चेत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार : संजय सोपान कंद
“आपलं गाव हे आपलं कुटुंब आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, व्यवस्थित गटार व्यवस्था, पुरेशा पथदिव्यांची सुविधा आणि स्वच्छ परिसर मिळाला पाहिजे. आपल्या माता-भगिनी, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत.
गावातील सामान्य माणसाला आपल्या कामासाठी कोणासमोर वारंवार हात जोडावे लागू नयेत. प्रत्येक नागरिकाला आपले म्हणणे मांडता आले पाहिजे आणि ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, असा माझा प्रयत्न राहील. प्रत्येक प्रश्न समजून घेऊन तो सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. माझ्यासाठी प्रत्येक वस्ती महत्त्वाची, प्रत्येक कुटुंब महत्त्वाचे आणि प्रत्येक नागरिकाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे संजय कंद यांनी सांगितले.
लोणीकंद ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरपंचपदासाठी संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत. गावाच्या विकासाचा मुद्दा, नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक राजकीय समीकरणे यांवर निवडणुकीची दिशा ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संजय सोपान कंद यांच्या नावाभोवती निर्माण झालेली चर्चा आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे लोणीकंदमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments